Massive corruption in my department, a sensational statement made by the Minister himself

भाजप मंत्री राम सूरत यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राम सूरत राय यांच्या वक्तव्यावर जनता दल युनायटेडने आक्षेप घेतला आहे. जदयूचे आमदार खालिद अनवर यांनी असे म्हटले आहे की, नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही.

बिहार : बिहारमध्ये (Bihar Massive corruption) काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या भाजप आणि जदयूच्या सरकारमधील एका मंत्र्याने (Minister )  खळबळजनक वक्तव्य (sensational statement ) केले आहे. बिहार सरकारमधील भाजपचे मंत्री राम सूरत राय यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिली आहे. आपल्याच विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये राम सूरत हे मंत्री आहेत. त्यांनी आपल्या विभागात चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असल्याचे सांगितले आहे.

भाजप मंत्री राम सूरत यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राम सूरत राय यांच्या वक्तव्यावर जनता दल युनायटेडने आक्षेप घेतला आहे. जदयूचे आमदार खालिद अनवर यांनी असे म्हटले आहे की, नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. बिहार असे एकमेव राज्य आहे जिथे मोठ्या पदावरील नेत्यांवर भ्रष्टाचारामुळे कारवाई करण्यात आली आहे.

सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने असे विधान केल्यामुले काँग्रेस आणि राजदने चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या मंत्र्यानेच मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आधीच्या मंत्र्याची चौकशी केली पाहिजे असे राजदचे नेते भाई वीरेंद्र यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन यावर कारवाई केली पाहिजे. असे ही भाई विरेंद्र यांनी म्हटले आहे.