उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय – मथुरेत श्रीकृष्ण मंदिराजवळील १० किलोमीटरच्या भागात दारू,मांस विक्रीवर बंदी

 उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) सरकारने मथुरेतील(Mathura) श्रीकृष्ण मंदिराजवळील १० चौरस किलोमीटर क्षेत्र तीर्थस्थळ (10 Sqkm Area Of  Mathura Vrindavan Declared As Pilgrimage)म्हणून जाहीर केलं आहे. श्रीकृष्ण मंदिराजवळील १० किलोमीटरच्या भागात दारू आणि मांस विक्रीवर(Meat And Liquor Banned In Mathura) मनाई असणार आहे.

    उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मथुरेतील(Mathura) श्रीकृष्ण मंदिराजवळील १० चौरस किलोमीटर क्षेत्र तीर्थस्थळ (10 Sqkm Area Of Mathura Vrindavan Declared As Pilgrimage)म्हणून जाहीर केलं आहे. श्रीकृष्ण मंदिराजवळील १० किलोमीटरच्या भागात दारू आणि मांस विक्रीवर(Meat And Liquor Banned In Mathura) मनाई असणार आहे. या भागात येणाऱ्या भाविकांच्या आस्थेचा विचार करत योगी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मथुरेला श्रीकृष्ण दर्शनासाठी आले होते. यावेळी साधूसंतांनी केलेल्या मागणीनुसार मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या व्यवसायामुळे प्रभावित लोकांना त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचा सल्लाही दिला होता.

    योग्य आदित्यनाथ यांनी मथुरा जिल्हा प्रशासनाला आदेश दिल्यानंतर १० दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

    “मथुरा वृंदावन क्षेत्रातील सुमारे १० चौरस किमी क्षेत्र तीर्थक्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. या भागात उत्पादन शुल्क आणि अन्न नागरी पुरवठा विभागाकडून पाहणी करण्यात येईल. त्यानंतर या भागातील परवाने रद्द करण्यात येतील”, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी  दिली आहे.

    या तीर्थक्षेत्राच्या अंतर्गत २२ वॉर्ड येतात. घाटी बहलराई, गोविंदनगर, मंडी रामदास, चौबियापाडा, द्वारिकापुरी, नवनीत नगर, बाणखंडी, भरतपूर गेट, अर्जुनपुरा, हनुमान टिला, जगन्नाथ पुरी, गौघाट, मनोहरपुरा, बैराजपुरा, राधानगर, बद्रीनगर, कृष्णानगर, कोयला गली, दंपियार नगर आणि जयसिंग पुरा या भागांचा समावेश आहे. योगी सरकारच्या या निर्णयानंतर साधूसंतांनी आनंद व्यक्त केला आहे.