Meeting between Asaduddin Owaisi and Suheldev Bharatiya Samaj Party President Omprakash Rajbhar Criticism of Minister Mohsin Raza

लखनौ :  लखनऊमध्ये अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांच्या बैठकीनंतर राज्याचा राजकीय पारा चढला आहे.

उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री मोहसीन रझा म्हणाले की, देश तोडणारे लोक एका व्यासपीठावर येत आहेत. यापूर्वी आम आदमी पार्टीने यूपीमध्ये निवडणुका लढविण्याविषयी चर्चा केली होती. आता हे स्पष्ट झाले आहे की देश तोडणारे, दंगेखोर आणि तुष्टीकरण करणारे राजकारणी व्यासपीठावर येत आहेत असे ते म्हणाले.

योगी-मोदींवर जनतेचा विश्वास

ही एक अशी युती आहे ज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि कलम ३७० बाबत तक्रार आहे आणि हेच सर्व एकत्रित निवडणुका लढविणार आहेत असे रझा म्हणाले. ते म्हणाले की देशातील १३० कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे आणि उत्तर प्रदेशातील २४ कोटी जनतेचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर विश्वास आहे. सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास यांच्या कल्पनेवरुन भाजपा काम करते असेही ते म्हणाले.

काँग्रेसची मदार अल्पसंख्यंकांवर

अल्पसंख्यंकांच्या पाठिंब्याने २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेस उत्तर प्रदेशातील सत्ता हस्तगत करण्यात यश मिळवेल असा दावा माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी केला. उत्तर प्रदेश अल्पसंख्यंक कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली या बैठकीत त्यांनी हा दावा कला. घातक शक्तींविरोधात लढा देण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना ग्रामसभेपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. या बैठकीत काँग्रेस सरचिटणीस व प्रभारी प्रियांका गांधी यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला.