पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट, नेमकं भेटीमागचं कारण काय?

काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेश जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, जितीन प्रसाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

    नवी दिल्ली:उत्तर प्रदेशातही राजकीय घडामोडींना वेग आला असून, नवी दिल्लीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत आता उत्सुकता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

    गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यास योगी आदित्यनाथ अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे. यामुळे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.