मेघालयावर ओढवणार वीज संकट; 504.41 कोटींची थकबाकी

    शिलाँग : ईशान्य विद्युत कॉर्पोरेशन लिमिटेड (एनईईपीसीओ) ने मेघालय सरकारला नोटीस पाठविली आहे. यात सांगण्यात आले की, 504.41 कोटी रुपयांचे थकबाकी भरण्यात आले नाही, तर ते 20 मार्चपासून वीज पुरवठा मर्यादित करण्यात येईल.

    यामुळे राज्यावर पुन्हा एकदा वीज संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने मेघालय पावर डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन लिमिटेडने थकबाकी न भरण्यावर चिंता व्यक्त केली आहे. तर, यासाठी 1,345.72 कोटी रुपयांच्या कर्जालाही मंजुरी देण्यात आली आहे.

    एनईईपीसीओचे कार्यकारी निदेशक (वाणिज्यिक) एन के माओ यांनी नुकतेच एका पत्रकात सांगितले की, विविध स्तरावर वारंवार विनंती करूनही वीजेची थकबाकी परतफेड करण्यात आली नाही. 15 मार्चपर्यंत एकूण थकबाकी 504.41 कोटी रुपये एवढी आहे.