सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय, अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं ; जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरून मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला थेट इशारा

मेहबुबा मुफ्ती एका व्यासपीठावरून जाहीरपणे सांगितलं की, सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय, एवढी मोठी शक्ती अमेरिका त्यांना देखील तिथून सामान बांधून परत जावं लागलं. तुम्हाला अजूनही संधी आहे. ज्याप्रकारे वाजपेयींनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणे तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटलं आहे.

    जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावरून मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे. सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय, अमेरिकेला आपलं सामान बांधून परत जावं लागलं, असं मेहबुबा मुक्ती म्हणाल्या. तसेच जम्मू-काश्मीरवर चर्चा नाही केली तर फार उशीर होईल. असा इशारा त्यांनी दिलेला आहे.

    मेहबुबा मुफ्ती एका व्यासपीठावरून जाहीरपणे सांगितलं की, सुधारा, सांभाळा शेजारी पाहा काय होतंय, एवढी मोठी शक्ती अमेरिका त्यांना देखील तिथून सामान बांधून परत जावं लागलं. तुम्हाला अजूनही संधी आहे. ज्याप्रकारे वाजपेयींनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणे तुम्ही देखील जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा सुरू करा आणि जे तुम्ही लुटलं आहे. बेकायदेशीरपणे, जे जम्मू-काश्मीरचं चित्र तुम्ही खराब केलं आहे. जम्मू-काश्मीरचे तुकडे तुकडे केलेत. ही चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल. असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.