मेट्रोमॅनचे प्रचारातील सक्तीचे धर्मांतर, लव्ह जिहाद मुद्दे ठरले निष्फळ; ई श्रीधरन यांची राजकीय गाडी सुरू होण्याआधीच रुळावरुन घसरली

ई श्रीधरन यांची देशभर मेट्रोमॅन अशी ओळख आहे. त्यांनी १९७० मध्ये कोलकाता मेट्रो नंतर कोचिन शिपयार्ड, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोच्ची मेट्रो, लखनऊ मेट्रो या प्रकल्पांचे नेतृत्व केले होते. लोकप्रियतेचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने केरळमध्ये ई श्रीधरन यांना उमेदवारी दिली.

    नवी दिल्ली: केरळमधील पलक्कड विधानसभा मतदारसंघा मधून निवडणूक लढवणाऱ्या मेट्रोमॅन ई श्रीधरन यांची गाडी राजकीय ट्रॅकवरुन घसरली आहे. या निवडणुकीत ई श्रीधरन यांचा पराभव काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परमबिल यांनी केला आहे. शफी यांनी ७ हजार ४०३ मतांनी विजय मिळवला आहे.

    ई श्रीधरन यांची देशभर मेट्रोमॅन अशी ओळख आहे. त्यांनी १९७० मध्ये कोलकाता मेट्रो नंतर कोचिन शिपयार्ड, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोच्ची मेट्रो, लखनऊ मेट्रो या प्रकल्पांचे नेतृत्व केले होते. लोकप्रियतेचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने केरळमध्ये ई श्रीधरन यांना उमेदवारी दिली.

    केरळमध्ये भाजपचा विशेष प्रभाव नाही. पण ई श्रीधरन यांची मेट्रोमॅन अशी प्रतिमा आहे. त्यांनी १९७० मध्ये कोलकाता मेट्रो नंतर कोचिन शिपयार्ड, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोच्ची मेट्रो, लखनऊ मेट्रो या प्रकल्पांचे नेतृत्व केले होते. देशभर एक अभियंता आणि उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. या लोकप्रियतेचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने केरळमध्ये ई श्रीधरन यांना उमेदवारी दिली. मूळचे केरळचे असलेल्या वयाच्या ८८व्या वर्षी निवडणूक लढवणाऱ्या ई श्रीधरन यांचा ७ हजार ४०३ मतांनी पराभव झाला.