मोदी-ममता संघर्ष शिगेला, बंगालचे मुख्य सल्लागार अल्पान बंडोपाध्याय यांना केंद्रीय गृहमंत्रालयाची नोटीस, होऊ शकतो १ वर्षाचा तुरुंगवास

पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अल्पान बंडोपाध्याय यांनी आपातकालीन व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना केंद्रीय गृहखात्यानं नोटीस बजावलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली यास वादळाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीकडे बंडोपाध्याय यांनी पाठ फिरवली होती. त्याप्रकरणी आता केंद्रीय गृह मंत्रालयानं नोटीस पाठवलीय. 

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालल्याचं दिसतंय. पश्चिम बंगालच्या मुख्य सचिव पदावरून नुकतेच निवृत्त झालेला अल्पान बंडोपाध्याय यांना केंद्र सरकारनं पाचारण केलं होतं. मात्र केंद्र सरकारच्या ऑफरकडं पाठ फिरवणं आता बंडोपाध्याय यांना चांगलंच महागात पडण्याची चिन्हं आहेत.

    पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अल्पान बंडोपाध्याय यांनी आपातकालीन व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना केंद्रीय गृहखात्यानं नोटीस बजावलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली यास वादळाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीकडे बंडोपाध्याय यांनी पाठ फिरवली होती. त्याप्रकरणी आता केंद्रीय गृह मंत्रालयानं नोटीस पाठवलीय.

    या नोटीसीनुसार देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या बैठकीकडे पाठ फिरवण्याबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना करण्यात आलीय. त्याचप्रमाणं बंडोपाध्याय जर समाधानकारक कारण देऊ शकले नाहीत, तर त्यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते. या नोटीशीला आता बंडोपाध्याय काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

    दरम्यान, जो डर गया, वो मर गया, असा शोले सिनेमातला डायलॉग मारत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या दादागिरीविरोधात आवाज उठवला होता. सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांनी एकत्र येत राज्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी पुढं यावं, असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. त्यानंतर केंद्र विरुद्ध पश्चिम बंगाल हा संघर्ष उफाळून येत असल्याचं चित्र दिसतंय.