काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी केली भाजपा नेत्याची हत्या

काश्मीरमधझील कुलगाममध्ये अतिरेक्यांनी एका भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या दोन वर्षात अतिरेक्यांनी भाजपा नेते कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. मंगळवारी अतिरेक्यांनी जावेद अहमद डार यांची घरात घुसून हत्या केली. ते होमशालिबागचे विभाग अध्यक्षपदी काम पाहात होते.

    श्रीनगर : काश्मीरमधझील कुलगाममध्ये अतिरेक्यांनी एका भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या दोन वर्षात अतिरेक्यांनी भाजपा नेते कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. मंगळवारी अतिरेक्यांनी जावेद अहमद डार यांची घरात घुसून हत्या केली. ते होमशालिबागचे विभाग अध्यक्षपदी काम पाहात होते.

    दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डार यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. भाजपाने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी द रजिस्टेंस फ्रंट या संघटनेने स्वीकारली आहे.

    या संघटनेवर तोयबाचे नियंत्रण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डार यांच्या हत्येनंतर सीआरपीएफने संपूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.