वाह मोदी जी वाह ! तुमच्यामुळे ममता बॅनर्जी पडल्या बुचकळ्यात, मंदिरात जावं की मशिदीत सध्या याच विचारात’ – गिरीराज सिंग

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग(giriraj singh reaction) म्हणाले की, ममता बॅनर्जी(mamata banerjee) या फक्त ‘निवडणुकीपुरत्या हिंदू’ (hindu)आहेत. ममता बॅनर्जी यांना दडपण आलं आहे. त्यामुळे त्यांनी स्तोत्रांचा जप केला आहे. “वाह रे मोदी, आज दीदी चंडीपाठ करत आहेत. रही है, वाह रे मोदी, निवडणूक त्यांना काय काय करायला लावत आहे.

    नंदीग्राममधील सभेमध्ये मंगळवारी ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले होते. यावेळी त्यानी रोज चंडीपाठ म्हणत असल्याचेही सांगितले. भाजपने हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

    यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग म्हणाले की, ममता बॅनर्जी या फक्त ‘निवडणुकीपुरत्या हिंदू’ आहेत.
    ममता बॅनर्जी यांना दडपण आलं आहे. त्यामुळे त्यांनी स्तोत्रांचा जप केला आहे. “वाह रे मोदी, आज दीदी चंडीपाठ करत आहेत. रही है, वाह रे मोदी, निवडणूक त्यांना काय काय करायला लावत आहे.

    भाजप नेते गिरीराज सिंह म्हणाले की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी जरा घाबरल्या आहेत आणि त्यांना मशिदीत जायचे की मंदिरात हे कळत नव्हते.

    पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या काळात विधानसभा निवडणुका आठ टप्प्यात पार पडणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत.