हे बरंय ! आम्ही असं म्हणालो असतो तर काय झालं असतं? मोदींचा ममतांना सवाल

भाजपच्या विरोधात सर्व मुस्लिमांनी एकत्र येत आपल्याला मतदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं. असं आवाहन करावं लागणं हा एक प्रकारे पराभव मान्य करण्याचाच प्रकार असल्याचं मोदींनी म्हटलंय. आम्ही जर सर्व हिंदुंनी एकत्र येऊन आम्हाला मतदान करावं, असं म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाने आम्हाला नोटीस पाठवली असती आणि दुसऱ्या दिवशी देशातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये यावरून आमच्यावर टीका झाली असती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 

    देशात एकीकडे कोरोना कहर सुरू असताना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचारदेखील जोरदार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर कडाडून टीका केलीय. मुस्लिम कार्ड खेळणाऱ्या ममता बॅनर्जींना पंतप्रधान मोदींनी काही सवाल विचारले.

    भाजपच्या विरोधात सर्व मुस्लिमांनी एकत्र येत आपल्याला मतदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं. असं आवाहन करावं लागणं हा एक प्रकारे पराभव मान्य करण्याचाच प्रकार असल्याचं मोदींनी म्हटलंय. आम्ही जर सर्व हिंदुंनी एकत्र येऊन आम्हाला मतदान करावं, असं म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाने आम्हाला नोटीस पाठवली असती आणि दुसऱ्या दिवशी देशातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये यावरून आमच्यावर टीका झाली असती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

    नागरिकांनी भगवे कपडे घालणे आणि गंध लावणे यालाही आता ममता बॅनर्जी आक्षेप घेत असल्याची टीका मोदींनी केलीय. बंगालमध्ये भाजपची हवा असून या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या प्रचारसभेत ‘दीदी ओ दीदी’ असा ममता बॅनर्जींचा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधानांवर सोशल मीडियातून चांगलीच टीका झाली होती. त्यानंतर मोदींनी आपली भाषा बदलल्याचं या सभेत दिसून आलं. या सभेत मोदींनी ‘आदरणीय दीदी’ असं संबोधन वापरलं.

    ममता बॅनर्जी मुस्लीम मतदारांना आवाहन का करत आहेत, असा सवाल मोदींनी विचारलाय. ज्या मुस्लिम व्होट बँकेच्या भरवशावर दीदींचं राजकारण सुरू आहे, तीदेखील आता हातातून निसटत चालल्याचं जाणीवेनंच ममतांना असं आवाहन करावं लागत असल्याचं मोदींनी म्हटलंय.