इंधन आणि नैसर्गिक वायु सेक्टरबाबत मोदी लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता?

नैसर्गिक वायुचे दर १.७९  ड़ॉलर एमएमबीटीयूच्या विक्रमी स्तरावर घसरले होते. याचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील गॅस उत्पादक कंपनी ओएनजीसी आणि ऑईल इंडियाच्या महसुलावरही झाला होता. तसे पाहता नैसर्गिक वायुचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. यासोबतच वीज निर्मिती उद्योगातही या वायुचा वापर केला तर जातोच शिवाय घरोघरी पाईपद्वारेही वायुचा पुरवठा केला जातो आणि कार तसेच अन्य वाहनांमध्येही याचा उपयोग होत असतो

 दिल्ली : मोदी ( PM Modi ) कॅबिनेटमध्ये इंधन आणि नैसर्गिक वायु (fuel and natural gas ) सेक्टरबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकार आता यावरील नियंत्रण हटविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वेगवेगळ्या टप्प्यात किमतीवरील नियंत्रण हटविले जाईल अशी माहितीही सूत्राने दिली. उल्लेखनीय असे की, गेल्याच आठवड्यात सरकारने नैसर्गिक वायुच्या दरात २५ टक्के कपात केली होती. या कपातीनंतर नैसर्गिक वायुचे दर १.७९  ड़ॉलर एमएमबीटीयूच्या विक्रमी स्तरावर घसरले होते. याचा परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील गॅस उत्पादक कंपनी ओएनजीसी आणि ऑईल इंडियाच्या महसुलावरही झाला होता. तसे पाहता नैसर्गिक वायुचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. यासोबतच वीज निर्मिती उद्योगातही या वायुचा वापर केला तर जातोच शिवाय घरोघरी पाईपद्वारेही वायुचा पुरवठा केला जातो आणि कार तसेच अन्य वाहनांमध्येही याचा उपयोग होत असतो.

बिहार निवडणुकीचा अडसर

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट या सेक्टरला डी रेग्युलेट करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याचा अर्थ सरकारचे यावर नियंत्रण नसेल. तसे जर झाले तर मात्र तो सरकारचा आजवरचा सर्वात मोठा निर्णय ठरेल. याबाबत मुख्य पेच बिहार विधानसभा निवडणुकीचा असून कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतरही सरकारला सर्वप्रथम निवडणूक आयोगाची मंजूरी घ्यावी लागेल.

ई-लिलावास मंजुरी

नैसर्गिक वायुच्या मार्केटिंगबाबत सरकारने नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून पेट्रोलि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहगिती दिली. जीवाश्म इंधन आयातीवरील निर्भरता कमी झाली असल्याचे नमूद करतानाच नैसर्गिक गॅस मूल्य निर्धारण पारदर्शक बनविण्यासाठी ई-बोली प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकार भारतीय ग्राहकांना स्वस्त दरात ऊर्जा उपलब्ध करून देण्यास तयार असून त्यासाठी विविध स्रोत जसे सौर, जैव इंधन, जैव गॅस, सिंथेटिक गॅस आदी माध्यमातून ऊर्जा पुरविण्याची तयारी असल्याची माहितीही त्यांनी दिली.