मोदी टीव्हीवर रडतील; खासदार संजय सिंह याचं वक्तव्य खरं ठरलं…

दरम्यान संजय सिंह यांनी एप्रिल महिन्यात असं वक्तव्य केलं होतं की, ''पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना टीव्हीवर येऊन रडतील.'' संजय सिंह यांनी दोन्ही व्हिडिओ एकत्र करून शेअर केला आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. व्हिडिओ कॉन्फरन्समधला मोदींचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आपण मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे.

    संजय सिंह यांचा दावा

    दरम्यान संजय सिंह यांनी एप्रिल महिन्यात असं वक्तव्य केलं होतं की, ”पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना टीव्हीवर येऊन रडतील.” संजय सिंह यांनी दोन्ही व्हिडिओ एकत्र करून शेअर केला आहे.

    तसेचं आम आदमी पार्टीनेसुद्धा याबाबत एक पत्रक जारी करून संजय सिंह यांनी केलेला दावा खरा ठरल्याचं म्हटलं आहे. राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी 17 एप्रिलला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये केलेलं भाकीत खरं ठरलं असल्याचं आम आदमी पार्टीने पत्रकात म्हटंल आहे. मुलाखतीत संजय सिंह यांनी म्हटलं होतं की, आणकी काही दिवस वाट बघा, ते तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाइट आणि कॅमेऱ्यासाठी वाट बघत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशातील माध्यमे पंतप्रधान कसे भावुक झाले आणि रडले ते दाखवतील.

    संजय सिंह यांनी मुलाखतीतील व्हिडिओ शेअर करत मोदींवर टीका केली आहे. संजय सिंह म्हणाले की, 17 एप्रिलला बोललो होतो, 21 मे रोजी खरं ठरलं. देशाला संवेदनशील आणि चांगलं मन असलेली व्यक्ती पाहिजे. ढोंगी पंतप्रधान देशाला नको आहेत ज्यांनी, निवडणुकीवेळी प्रचारसभा घेतल्या. त्यातून कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडून नाटक करत आहेत अशा शब्दांत संजय सिंह यांनी मोदींवर निशाणा साधला.