अब मोदी नही, सिर्फ योगी ! उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी संघाची नवी रणनिती, असा होणार प्रचार

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये आपला टोन बदलण्याचा निर्णय संघ आणि भाजपनं घेतलाय. योगी आदित्यनाथ हेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मुख्य चेहरा असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारापासून आणि युपी निवडणुकांपासून दूर ठेवण्यात यावं, असा निर्णय संघाच्या  दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

    पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी रणनिती आखायला सर्वच पक्षांनी सुरुवात केलीय. उत्तरप्रदेशमध्ये सध्या सत्तेवर असणाऱ्या भाजपनं यात पुढाकार घेत पुन्हा एकदा युपीत भगवा फडकावण्यासाठी जय्यद तयारी केलीय. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

    उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये आपला टोन बदलण्याचा निर्णय संघ आणि भाजपनं घेतलाय. योगी आदित्यनाथ हेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मुख्य चेहरा असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारापासून आणि युपी निवडणुकांपासून दूर ठेवण्यात यावं, असा निर्णय संघाच्या  दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

    उत्तर प्रदेश निवडणुकीत अधिकाधिक मुस्लिम उमेदवारांना तिकीटे देण्यात यावीत, असा फैसला झाल्याचंही समजतंय. त्यामुळे योगींच्या नेतृत्वाखाली आणि सर्वसमावेशकता दाखवत उत्तर प्रदेशमधील निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी सध्या संघ आणि भाजप करत असल्याचं चित्र आहे.

    युपीसह इतर पाच राज्यांतील निवडणुकांपासूनही मोदींना दूर ठेवलं जाणार आहे. मोदी हे पंतप्रधान असून राज्याच्या प्रचारात त्यांना उतरवल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचं संघाचं मत आहे. ते प्रचारात उतरल्यावर विरोधक त्यांच्यावर टीका करतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा खालावते, असं संघाचं म्हणणं आहे. पंतप्रधान मोदी या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असतील, मात्र स्वतः प्रचारात उतरणार नाहीत, अशी माहिती आहे.

    पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. बंगालमध्ये ममता विरुद्ध मोदी अशी लढाई झाल्यामुळे मोदींच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम झाल्याचं संघाचं मत आहे. स्थानिक नेत्यांसोबत मोदींची तुलना होणे योग्य नसल्याचंही संघाला वाटतंय.