मनी लाँड्रिंगचा आरोप; आमदार खैरा यांच्या घरावर ईडीची छापेमारी

पंजाब एकता पक्षाचे प्रमुख आणि आमदार सुखपालसिंह खैरा यांच्या चंदीगढमधील सेक्टर पाच येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी सकाळी छापा टाकला. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही छापेमारी करण्यात आली आहे.

    चंदीगढ (Chandigadh). पंजाब एकता पक्षाचे प्रमुख आणि आमदार सुखपालसिंह खैरा यांच्या चंदीगढमधील सेक्टर पाच येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी सकाळी छापा टाकला. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही छापेमारी करण्यात आली आहे. ईडीचे एक पथक तीन वाहनांमधून खैरा यांच्या भुलत्थ येथील निवासस्थानीही दाखल झाले व त्यांनी खैरा यांची चौकशी केली.

    खैरा हे सन 2017 मध्ये भुलत्थ येथून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी ‘आप’चा राजीनामा देत पंजाब एकता पक्षाची स्थापना केली होती. राजकीय षडयंत्र दरम्यान, खैरा यांनी राजकीय षडयंत्रांतर्गत फसविण्यात आल्याचा आरोप केला.

    ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे, खैरा यांचे वकीलांनी कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या दोलनामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला. खैरा यांच्या घरासह त्यांचे चुलत भाऊ कुलबीर सिंह यांच्या घरीही ईडीने छापा टाकला. कुलबीर सिंह खैरा यांचे नीकटवर्तीय मानले जातात.