तृणमूलमध्ये घरवापसी केल्यावर मुकुल रॉय यांचे केंद्राला पत्र

मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बॅनर्जी सरकारने त्यांना राज्य स्तरावरील सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे. केंद्र सरकारने मुकुल रॉय यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. मुकुल रॉय यांनी टीएमसीला रामराम करत ४ वर्षांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता १ दिवसांपुर्वी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे.

    भाजपला रामराम करत मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुकुल रॉय यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आपली केंद्रीय सुरक्षा व्यवस्था परत घ्यावी अशी विनंती केली आहे.

    भाजपमध्ये असताना मुकुल रॉय यांना केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. परंतु आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. यामुळे रॉय यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था परत घेण्याची विनंती केली. मुकुल रॉय यांनी लिहिलेल्या पत्राला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही आहे.