गैर-मुस्लिमांविरोधात ‘नार्कोटिक जिहाद’ ; केरळ कॅथलिक बिशपचा अजब दावा

राज्यात ख्रिश्चन मुली (Christian girls) मोठ्या संख्येत 'लव्ह जिहाद' (love jihad) आणि 'नार्केटिक जिहाद'च्या (narcissistic jihad) जाळ्यात अडकत असल्याचा दावा बिशपने केला आहे. कट्टरतावादी तरुण इतर धर्मांतील तरुणींना उद्ध्वस्त करण्यासाठी 'लव्ह जिहाद' आणि 'नार्केटिक जिहाद'सारख्या मार्गांचा वापर केला जात असल्याचे बिशप मार जोसेफ (Bishop Mar Joseph) कल्लारनगट्ट (Kallarangutt) यांनी केला.

    कोट्टायम (Kottayam) : केरळच्या एका कॅथलिक बिशपने (Catholic bishop of Kerala) केलेल्या एका दाव्यामुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. राज्यात ख्रिश्चन मुली (Christian girls) मोठ्या संख्येत ‘लव्ह जिहाद’ (love jihad) आणि ‘नार्केटिक जिहाद’च्या (narcissistic jihad) जाळ्यात अडकत असल्याचा दावा बिशपने केला आहे. हत्यारांचा वापर न करता कट्टरतावादी तरुण इतर धर्मांतील तरुणींना उद्ध्वस्त करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्केटिक जिहाद’सारख्या मार्गांचा वापर केला जात असल्याचे बिशप मार जोसेफ (Bishop Mar Joseph) कल्लारनगट्ट (Kallarangutt) यांनी केला.

    कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगडमध्ये चर्चेच्या एका जाहीर कार्यक्रमा दरम्यान बिशप कल्लारनगट्ट यांनी हा दावा केल्यानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सायरो मालाबार चर्चशी बिशप संबंधीत आहेत.

    धर्मांतरण करून शोषण (Exploitation by conversion)
    ‘लव्ह जिहाद’मध्ये गैर मुस्लिम तरुणींना विशेषत: ख्रिश्चन समुदायातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतरण घडवून आणले जाते तसेच त्यांचे शोषण केले जाते. दहशतवादासारख्या विध्वंसक कामांसाठी त्यांचा वापर केला जातो, असा दावा बिशप कल्लारनगट्ट यांनी केला. अशा जिहादींविरोधात इतर समाजातील लोकांनी जागरुक राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

    ‘लव्ह जिहाद’सोबतच केरळमध्ये ‘नार्कोटिक जिहाद’चाही (अमली पदार्थांचा वापर) वापर केला जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मादक पदार्थांचा वापर करून हत्यारांशिवाय इतर धर्मांतील नागरिकांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपले लक्ष्य गाठण्यासाठी जिहादी अशा पद्धतीचे इतरही मार्ग स्वीकारत असल्याचे कल्लारनगट्ट यांनी म्हटले आहे.

    केरळ दहशतवाद्यांचे भरती केंद्र (Kerala Terrorist Recruitment Center)
    केरळ हे दशतवाद्यांसाठी एक भरती केंद्र बनल्याचा तसेच राज्यातील अनेक ख्रिश्चन आणि हिंदू तरुणींचे जबरदस्तीने धर्मांतरण करून त्यांना अफगाणिस्तानातील शिबिरांत धाडले जात असल्याचा आरोप बिशप कल्लारनगट्ट यांनी केला. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘नार्कोटिक जिहाद’ सारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही असे जे राजकीय नेते, सामाजिक सांस्कृतिक नेते म्हणत आहेत ते वास्तवापासून स्वत:ची डोळेझाक करत आहेत. यामागे त्यांचा स्वार्थही असू शकतो.

    मुस्लिम संघटनांचा आक्षेप (Objection of Muslim organizations)
    याचा विरोध करताना, केवळ केरळच्या समाजात धार्मिक फूट पाडणे हाच बिशपनं केलेल्या दाव्याचा उद्देश असल्याचे मुस्लिम संघटनांनी म्हटले आहे. ‘केरळ सुन्नी फेडरेशन’कडून मुस्लिम समुदायाला निशाणा बनवणाऱ्या या आरोपांना बिशप यांनी सिद्ध करावे, असे आव्हान दिले आहे. राज्य सरकारने बिशप यांचे हे आरोप गंभीरतेने घेत समाजात फूट पाडण्याचे कट-कारस्थान रचण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही फेडरेशनकडून करण्यात आली.