नरेंद्र मोदी व राज्यपालांना ममता बॅनर्जींची अर्धा तास वाट पाहावी लागली

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हिंगलगंज आणि सागर येथे आढावा बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कालैकुंडा येथे भेटले आणि त्यांना पश्चिम बंगालमधील चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. माहितीसाठी त्यांना आपत्ती अहवाल सादर करण्यात आला आहे. आता दिघामधील मदत व जीर्णोद्धार कामांचा आढावा घेण्यासाठी पुढे जात आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

    कोलकाता : दोन दिवसांपू्र्वी यास चक्रीवादळामुळे (Cyclone Yaas) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी एका आढावा बैठकीत भाग घेतला. पण, या बैठकीत नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांना सुमारे 30 मिनिटे वाट पाहावी लागली. सरकारी सूत्रांनी दावा केला आहे की, पंतप्रधान आणि राज्यपाल यांनी आढावा बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची 30 मिनिटे वाट पाहिली.

    या घटनेसंदर्भात पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्वीट केले की, संघर्षाची ही प्रवृत्ती राज्य किंवा लोकशाहीच्या हिताची नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग न घेणे घटनात्मकता किंवा कायद्याच्या नियमांला धरून नाही. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी दिघाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्याविषयी माहिती दिली होती.