नक्षलवाद्यांचा पत्रकाराला फोन, ताब्यात असलेल्या जवानाबाबत दिली ही माहिती

या चकमकीदरम्यान २२ जवान तर शहीद झालेच, मात्र एका जवानाला नक्षलवाद्यांनी ताब्यात घेऊन पळवून नेलं होतं. या जवानाचा शोध घेऊन त्याची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला फोन करून या जवानाबाबत माहिती दिलीय. बिजापूरमधील गणेश मिश्रा नावाच्या पत्रकाराला नक्षलवाद्यांनी फोन करून या जवानाबाबत माहिती दिली. 

    देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना नक्षलवादीेदेखील तोंड वर काढताना दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये ३ एप्रिलला पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले होते. बेसावध असणाऱ्या पोलिसांवर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.

    या चकमकीदरम्यान २२ जवान तर शहीद झालेच, मात्र एका जवानाला नक्षलवाद्यांनी ताब्यात घेऊन पळवून नेलं होतं. या जवानाचा शोध घेऊन त्याची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नक्षलवाद्यांनी एका पत्रकाराला फोन करून या जवानाबाबत माहिती दिलीय. बिजापूरमधील गणेश मिश्रा नावाच्या पत्रकाराला नक्षलवाद्यांनी फोन करून या जवानाबाबत माहिती दिली.

    या जवानाला गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं नक्षलींनी या पत्रकाराला सांगितलं. त्याच्यावर वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याची सुटका केली जाईल, असंही नक्षलींनी केलेल्या फोनमधून माहिती दिलीय. या जवानाचे फोटो आणि व्हिडिओदेखील लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

    सीआरपीएफच्या २१० कोब्रा बटालियनमधील जवान राकेश्वर सिंह मन्हास सध्या बेपत्ता आहेत. नक्षलवाद्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानं त्यांचा शोध सुरू होता. मात्र नक्षलींनीच फोन करून त्याबाबत माहिती दिलीय.