झोमॅटो डिलिव्हरी प्रकरणात नवा क्लायमॅक्स, आता महिलेवरही गुन्हा दाखल

झोमॅटो डिलिव्हरी प्रकरणात डिलिव्हरी बॉय कामराजच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री सॉफ्टवेअर डिझायनर आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर हितेशा चंद्रानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राणघातक हल्ला करणे, एखाद्याच्या अपमान करून गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि धमकी देणे हे तीन आरोप हितेशावर लावण्यात आलेत. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केलाय. 

    बंगळुरूमध्ये घडलेल्या झोमॅटो डिलिव्हरी प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं असून डिलिव्हरी बॉयविरोधात खोटी तक्रार आणि त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे.

    झोमॅटो डिलिव्हरी प्रकरणात डिलिव्हरी बॉय कामराजच्या तक्रारीनंतर सोमवारी रात्री सॉफ्टवेअर डिझायनर आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर हितेशा चंद्रानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राणघातक हल्ला करणे, एखाद्याच्या अपमान करून गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि धमकी देणे हे तीन आरोप हितेशावर लावण्यात आलेत. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास सुरु केलाय.

    बंगळुरुमध्ये एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेवर हल्ला केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली होती. महिलेनं दिलेली माहिती आणि तिने समाजमाध्यमांवर अपलोड केलेला व्हिडिओ यातून डिलिव्हरी बॉयने ऑर्डर रद्द केल्याच्या रागातून तिच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या डिलिव्हरी बॉयला अटक करन त्याची चौकशी कैली. त्यानं दिलेल्या जबानीतून वेगळीच बाब समोर आलीय. त्यामुळे कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.

    डिलिव्हरी बॉयने दिलेल्या जबानीनुसार, जेव्हा तो ऑर्डर घेऊन त्या महिलेकडे आला, तेव्हा ती संतापलेली होती. उशीर झाल्याबद्दल त्याने तिच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. रस्त्यातील खड्डे आणि ट्रॅफिक यामुळे आपल्याला पोहोचायला उशीर झाल्याचंही त्यानं सांगितलं. मात्र त्या महिलेनं संतापून आपल्याला चपलेनं मारहाण करायला सुरुवात केली. आपल्याला मारहाण करताना त्या महिलेच्या हातातील अंगठी तिच्याच नाकाला लागली आणि त्यातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर तिने या घटनेला वेगळा अँगल देऊन आपल्याला त्यात गोवण्याचा प्रयत्न केला, असं या डिलिव्हरी बॉयनं सांगितलंय.

    महिला आणि डिलिव्हरी बॉय यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या घटनेचं वर्णन केल्यामुळे सत्य तपासण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. ऑर्डर येण्यास उशीर झाल्यामुळे आपण ऑनलाईन ऑर्डर रद्द करत होतो. त्याच दरम्यान डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला आणि आपण ऑर्डर रद्द करत असल्याचं सांगितल्यानंतर चिडून त्यानं आपल्यावर हल्ला केला, असा दावा या महिलेनं केला होता. तर या महिलेनंच आपल्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि झटापटीत स्वतःचीच अंगठी लागून ती जखमी झाल्याचा दावा डिलिव्हरी बॉयनं केलाय.