लग्न करा आणि सोनं मिळवा, सरकारची अनोखी योजना

लग्नात सोन्याचे दागिने करण्याची हौस अनेकांना असते. मात्र प्रत्येकालाच आपल्या मनाप्रमाणं सोन्याची खरेदी करणं परवडत नाही. सध्या सोन्याच्या किंमतीदेखील गगनाला भिडलेल्या आहेत आणि कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थितीदेखील खालावलेली आहे. अशा अवस्थेत लग्नासाठी सोन्याची तजवीज करायची कशी, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

भारतीय संस्कृतीत लग्न आणि सोनं यांचा जवळचा संबंध आहे. आपल्या मुलाला किंवा मुलीला लग्नात सोन्याचे अलंकार करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

लग्नात सोन्याचे दागिने करण्याची हौस अनेकांना असते. मात्र प्रत्येकालाच आपल्या मनाप्रमाणं सोन्याची खरेदी करणं परवडत नाही. सध्या सोन्याच्या किंमतीदेखील गगनाला भिडलेल्या आहेत आणि कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थितीदेखील खालावलेली आहे. अशा अवस्थेत लग्नासाठी सोन्याची तजवीज करायची कशी, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

सध्या आसाम सरकारनं मुलींसाठी सुरू केलेली एक योजना यासाठी लक्षवेधी ठरतीय. या योजनेचं नाव आहे अरुंधती गोल्ड स्कीम. या योजनेअंतर्गत सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांना ३० हजार रुपयांचं अनुदान देण्यात येतं. मात्र ही योजना केवळ लग्नापुरतीच आहे आणि या योजनेत पात्र ठऱण्यासाठी काही अटी आहेत. १० ग्रॅम सोन्याची किंमत जेव्हा ३० हजार रुपये होती, तेव्हा ही योजना सुरू झाली. आता सोन्याची किंमत वाढली असली, तरी योजनेतील रक्कम मात्र तेवढीच ठेवण्यात आलीय.

काय आहेत अटी?

  • विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत लग्नाची नोंदणी करणे आवश्यक
  • वधू कमीत कमी दहावीपर्यंत शिकलेली असावी
  • मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा अधिक नसावे
  • केवळ पहिल्या लग्नातच वधूला हा लाभ मिळेल
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचं वय १८ पेक्षा जास्त आणि मुलाचं वय २१ पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे