अभ्यासातून नवी माहिती समोर, ‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, तर…

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज 77 टक्क्यांनी व प्रकृती गंभीर होऊन आयसीयूमध्ये हलविले जाण्याचे प्रमाण 94 टक्क्यांनी कमी होते, अशी माहिती तमिळनाडूतील वेल्लोर येथील सीएमसी महाविद्यालयाने केलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे.

    चेन्नई : सध्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुतनिक-व्ही या तीन लसी देण्यात येतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या प्रकारच्या विषाणूंमुळे संसर्गाचं प्रमाण खूप वाढलं. अशात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज 77 टक्क्यांनी व प्रकृती गंभीर होऊन आयसीयूमध्ये हलविले जाण्याचे प्रमाण 94 टक्क्यांनी कमी होते, अशी माहिती तमिळनाडूतील वेल्लोर येथील सीएमसी महाविद्यालयाने केलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे.

    दरम्यान विविध रुग्णालयांतील हजार आरोग्यसेवकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. कोविशिल्ड या लसीच्या एका डोसनेही शरीरात पुरेशा प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज 90 टक्क्यांनी कमी होते असं या अभ्यासात दिसून आलं.

    देशामध्ये कोरोना लसींचा अजूनही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्र सरकारने वाढवले, असा आरोप काही वैद्यकीय तज्ज्ञांनी केला होता. तसेच आता विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसी मागविण्याची तयारी केंद्राने सुरू केली आहे.