उत्तराखंडमध्ये नवं राजकीय संकट, मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा

नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शनिवारी भाजप आमदारांची बैठक होईल. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, त्यांनी जेपी नड्डा यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे.

    देहराडून : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) नवं राजकीय संकट तयार झालं आहे. मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.

    नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शनिवारी भाजप आमदारांची बैठक होईल. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, त्यांनी जेपी नड्डा यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे. ते शुक्रवारी (२ जुलै) देहरादूनला पाहचले. रात्री ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. शनिवारी (३ जुलै) भाजप आमदारांची बैठक आहे. यात नरेंद्र सिंह तोमर निरिक्षक असणार आहेत.