Bhayyu Maharaj suicide case; Court blow to wife Ayushi

भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ रोजी स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या(bhayyu maharaj suicide case) केली होती. महाराजांचे तीन सेवेकरी विनायक, पलक आणि शरदला पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक(arrest) केली आहे.

  अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (bhaiyyu maharaj) आत्महत्या प्रकरणी शुक्रवारी महाराजांचा ड्रायव्हर आणि सेवेकरी  कैलाश पाटील याची फेरचौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये त्याने नवा खुलासा केला आहे.

  भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ रोजी स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. महाराजांचे तीन सेवेकरी विनायक, पलक आणि शरदला पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी फेरचौकशीत भय्यू महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावलेली होती असं कैलाशने म्हटलं आहे.जीपीएसमुळे महाराज कुठे जायचे याची माहिती मिळायची. महाराजांची पत्नी आयुषी गाडीत महाराजांसोबत जाणाऱ्या सेवेकऱ्याला त्यांच्यासोबत कोण आहे हे वारंवार विचारायची.

  शुक्रवारी फिर्यादीच्या वकिलांनी कैलाशचा दुसऱ्यांदा जबाब घेण्यासाठी त्याला बोलावण्याची मागणी केली. या प्रकरणात आता १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी सेवेकरी शेखरलाही बोलावण्यात आले आहे.या प्रकरणात आतापर्यंत २५ पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी घेऊन झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांमध्ये सुनावणी संपवा, असे सांगितले आहे.

  शुक्रवारी कैलाशनं न्यायालयाला सांगितलं की, आयुषी आणि कुहूमध्ये नेहमी भांडणं होत असायची. यामुळं महाराज चिंतित असायचे. आरोपी विनायक आणि शरद हे महाराजांचे विश्वासू सेवेकरी होते. घटनेच्या तीन महिने आधी महाराजांनी मला कुहूची गाडी चालवण्यासाठी पुण्याला पाठवलं होतं.

  कैलाशनं पुढे सांगितलं की, सानिया सिंह नावाची एक मॉडेल आणि अभिनेत्री महाराजांना भेटायला इंदौरला येत असे. तिचं जेवण महाराजांकडे लपूनछपून पाठवलं जायचं. महाराजांच्या गाडीवर नजर ठेवण्यासाठी त्यात जीपीआरएस ट्रॅकर होता.  महाराजांची पत्नी त्यांच्यासोबत असलेल्या सेवेकऱ्यांना महाराजांसोबत कोण आहे हे सारखे विचारायची.

  कैलाश म्हणाले की, महाराष्ट्राच्या एका संस्थेवर लोकांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होता.
  या सगळ्यामागे असलेल्या वर्षा नावाच्या महिलेनं मुलताईमध्ये कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली होती. महाराजांच्या खास लोकांनी हा सौदा केला होता. या प्रकरणातील पुढची सुनावणी १५ मार्च रोजी होईल.