संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) अलिगडमध्ये राहणाऱ्या ९ वर्षांच्या नवनीतच्या हृदयाच्या(Heart Problem Of Navnit) वॉल्वमध्ये दोष होता. त्यामुळे त्याला श्वास घ्यायाला त्रास होत होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडतच होती.

    लखनऊ :ह्रदयाची धडधड थांबली तर माणसाचं आयुष्य थांबतं. मात्र जगण्याचे संकेत देणारी हीच हृदयाची धडधड (Heart operation By Stopping Heart By One Hour) थांबवून एका ९ वर्षांच्या मुलाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये राहणाऱ्या ९ वर्षांच्या नवनीतच्या हृदयाच्या वॉल्वमध्ये दोष होता. त्यामुळे त्याला श्वास घ्यायाला त्रास होत होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडतच होती. कित्येक हॉस्पिटल फिरवल्यानंतर अखेर त्याला अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या (AMU) जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये (JNMC) दाखल करण्यात आलं.

    नवनीतच्या हृदयाची सर्जरी करावी लागणार होती. ज्यात त्याचं हृदय आणि फुफ्फुस तब्बल एक तास बंद करावं लागणार होतं. मात्र नवनीतचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारलं. त्याचं हृदय आणि फुफ्फुस थांबवून त्याची सर्जरी केली.

    कार्डियोथोरेसिक सर्जरी विभागाचे प्रो. मुहम्मद आजम हसीन यांनी सांगितलं, आम्हाला या मुलाची सर्जरी करणं गरजेचं होतं. कारण ९ वर्षांच्या मुलाचं वॉल्व बदलणं अशक्य होतं. सर्जरी करताना नवनीतच्या हृदयाचं आणि फुफ्फुसाचं कार्य ६० मिनिटांसाठी रखण्यात आलं. अखेर नवनीतवरील ऑपरेशन यशस्वी झाला. नवनीत  आता नीट श्वास घेत आहे. ज्या हृदयामुळे त्याचा एका एका श्वासासाठी संघर्ष सुरू होता. ते हृदय तासभर थांबवण्यात आलं आणि त्यामुळेच त्याला आता मोकळ श्वास घेता आला.

    डॉक्टरांनी सांगितलं, एएमयूमध्ये अशी सर्जरी केली जात नव्हती त्यावेळी इथले लोक दिल्ली आणि एसजीपीजीआई लखनऊकडे धाव घ्यायचे. हे ऑपरेशन आव्हानात्मक होतं. असं ऑपरेशन खूप कमी सरकारी रुग्णालयात केलं जातं.