porn video share in online class

राजस्थानच्या(Rajasthan) एका विद्यार्थ्यानं तर ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी नववीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला राजस्थानमध्ये अटक(15 Year old Student Arrested From Rajasthan) केली आहे.

    कोरोनाकाळात(Corona) सध्या शाळा आणि कॉलेज ऑनलाईनच(Online Class) सुरु आहेत.या ऑनलाईन क्लास दरम्यान अनेकदा विचित्र प्रकारही घडत आहेत.राजस्थानच्या(Rajasthan) एका विद्यार्थ्यानं तर ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी नववीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला राजस्थानमध्ये अटक(15 Year old Student Arrested From Rajasthan) केली आहे. या विद्यार्थ्यानं ऑनलाईन क्लासदरम्यान आपला प्रायव्हेट पार्ट महिला शिक्षिकेला दाखवला (Student Showed his Private Part During Online Class) होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ऑनलाईन क्लासमध्ये प्रायव्हेट पार्ट दाखवण्याची ही घटना खूप वेळा घडली. यानंतर महिला शिक्षिकेनं क्लास बंद करण्याचा विचार केला होता. मात्र पीडित शिक्षिकेनं मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात आरोपी विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे.

    या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मागील महिन्यातही मुंबई पोलिसांची टीम राजस्थानमध्ये गेली होती. जैसलमेरमधून आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याकडून एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपीनं आपल्या लॅपटॉपमध्ये गार्ड लावून ठेवलं होतं, जेणेकरून त्याचा आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅक होऊ नये. या विद्यार्थ्यानं अत्यंत हुशारीनं हे कृत्य केलं. मात्र महिला शिक्षिकेनं आरोपीच्या बॅकग्राऊंडचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवला होता. त्यावरून पोलिसांनीा तपास करण्यास मदत झाली.

    विद्यार्थ्याने सांगितलं की, मस्करी म्हणून ऑनलाईन क्लासदरम्यान त्याने प्रायवेट पार्ट दाखवला. सध्या त्या विद्यार्थ्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.