nipah virus

कोझिकोडमध्ये(Nipah In Kozhikode) ३ दिवसांपूर्वी बारा वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणूची लागण होऊन मृत्यू(Death By Nipah) झाला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे आहे. या ठिकाणी केंद्रीत तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आलं.

    कोरोनापेक्षाही(Corona) भयानक निपाह विषाणूने(Nipah Virus) पुन्हा एकदा केरळमध्ये(Keral) थैमान घातले आहे. याआधी २०१८मध्ये निपाह विषाणूचे संकट केरळच्या कोझीकोडमध्ये ओढवले होते. कोझिकोडमध्ये(Nipah In Kozhikode) ३ दिवसांपूर्वी बारा वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणूची लागण होऊन मृत्यू(Death By Nipah) झाला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे आहे. या ठिकाणी केंद्रीत तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आलं. या पथकानं मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांना भेट दिली. तसेच आसपासच्या परिसरातील रंबुतन या फळाच्या नमुन्यांची शोधाशोध सुरु आहे.

    केंद्रीय पथकाने या मुलाच्या कुटुंबियांना आणि आसपास राहणाऱ्या इतर नागरिकांना कोणत्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करायला हवं, याची माहिती दिली.मृत मुलगा मृत्यूआधी कुणाच्या संपर्कात आला होता आणि त्याने काय खाल्लं होतं, याचा तपास पथक करत आहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहून या मुलाप्रमाणे कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेला त्याची माहिती देण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे.

    दरम्यान, या पथकाने आसपासच्या परिसरातील रंबुतन या फळाचे नमुने गोळा करायला सुरुवात केली आहे. ही फळं खाणाऱ्या वटवाघुळांच्या मार्फत निपाह व्हायरसचा फैलाव प्राणी आणि माणसांमध्ये होतो, हे सिद्ध झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर हे नमुने गोळा करण्याचं काम सुरू आहे. या नमुन्यांवरून नेमका हा विषाणू मुलाच्या शरीरात कुठून आला, याचा शोध घेतला जाणार आहे.