कोरोनाच्या संकटातच निपाह विषाणूचा धोका, WHO ने सांगितली ५ गंभीर लक्षणं ; कशी घ्याल काळजी ?

देशातील सर्वात मोठ्या रूग्णालयात ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या निरीक्षकांनी काही सल्ले दिले आहेत. त्यांनी सांगितलं की, जमिनीवर पडलेल्या फळांना धुवून न खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. यातून सावधानता बाळगली पाहिजे.एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, निपाह विषाणूचा समावेश जनावरांमधून माणसांच्या शरिरात प्रवेश केल्यानंतर त्यांना निपाहची बाधा होते.

    देशात कोरोना विषाणूचे संकट कमी होताना दिसत आहेत. परंतु त्यातच आता अजून एका विषाणूचा धोका उदयास आला आहे. शिक्षणात सर्वाधिक अव्वल असलेला देश ओळखला जाणाऱ्या केरळमध्ये यावेळी दोन प्रकारच्या विषाणूंनी जन्म घेतल्याचे समजले जात आहे. केरळमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच आता निपाह विषाणूचा धोका वाढला असून तणावाचे वातावरण  निर्माण झाले आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची निपाहच्या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारला वाढणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

    एम्सने सांगितले सावधगिरीचे उपाय?

    देशातील सर्वात मोठ्या रूग्णालयात ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या निरीक्षकांनी काही सल्ले दिले आहेत. त्यांनी सांगितलं की, जमिनीवर पडलेल्या फळांना धुवून न खाल्ल्यामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. यातून सावधानता बाळगली पाहिजे.एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, निपाह विषाणूचा समावेश जनावरांमधून माणसांच्या शरिरात प्रवेश केल्यानंतर त्यांना निपाहची बाधा होते. निपाह व्हायरस फ्रूट बॅट किंवा फळ खाल्ल्या जाणाऱ्या वटवाघूळ या पक्षांमुळे सुद्धा जास्त प्रमाणात आजाराची उत्पत्ती होते. त्यानंतर हे फळ खाणारे जनावरं किंवा माणसांना निपाह विषाणूचे संक्रमण होते.

    निपाह व्हायरसची लक्षणं

    जागतिक आरोग्य संघटनेकडून निपाह विषाणूबाबत पाच प्रकारची लक्षणं सांगण्यात आली आहे. (NiV) विषाणू मोेठ्या प्रमाणात वाढतो, जो जनावरं आणि माणसांमध्ये गंभीर प्रकारचा आजार निर्माण करू शकतो. निपाह व्हायरच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास, मांसपेशींमध्ये दुखणे, डोकं दुखणे, ताप आणि अनेक प्रकारची लक्षणं आपल्या शरीरात आढळून येतात. अशा प्रकारची लक्षणं आढल्यानंतर मृत्यूचा धोका उद्भवू शकतो. असं डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आलं आहे.