nitish kumar

पाटणा उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर बिहार सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा(Lockdown in Bihar) केली आहे.

    बिहारमध्ये कोरोना रुग्णांची (Corona Patients in Bihar)संख्या वाढत आहे. त्यावर पाटणा उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर बिहार सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा(Lockdown in Bihar) केली आहे. सोमवारी न्यायालयाने लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारला विचारणा केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार(nitish kumar tweet) यांनी ट्विट करत लॉकडाऊनच्या संदर्भात माहिती दिली आहे.


    मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, “सहकारी मंत्री व अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर १५ मे २०२१ पर्यंत बिहारमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना व इतर कामांच्या संदर्भात आज आपत्कालीन व्यवस्थापन गटाला सूचना करण्यात आल्या आहेत”.

    कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांबाबत सोमवारी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारला लॉकडाऊन संदर्भात प्रश्न विचारला होता. उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारशी बोलण्यास सांगितले होते. ४ मे पर्यंत लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले होते.