लस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज नाही; सीरम, आयसीएमआरविरोधात तक्रार

लशींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने लस निर्माता कंपनी सीरम, आयसीएमआर, जागतिक आरोग्य संघटना आणि राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शहरातील आशियाना पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

  लखनौ : लशींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने लस निर्माता कंपनी सीरम, आयसीएमआर, जागतिक आरोग्य संघटना आणि राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शहरातील आशियाना पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

  बरे वाटत नसल्याची तक्रार

  प्रतापचंद्र असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्याने 8 एप्रिलला कोविशिल्ड लसीचा पहिला डोस त्यांनी घेतला होता. 28 दिवसांनी लसीचा डोस मिळणे अपेक्षित असताना त्यादिवशी दुसऱ्या डोसचा कालावधी सहा आठवड्यांनी वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर सरकारने हा कालावधी 12 आठवड्यांसाठी वाढवला. पहिला डोस घेतल्यानंतर बरे वाटत नव्हते, असेही त्याने तक्रारीत नमूद केले आहे.

  तपासणीअंती केली तक्रार

  दाखल तक्रारीत प्रतापचंद्रने आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांच्या कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात रोगप्रतिबंधात्मक शक्ती वाढते, या दाव्याचा दाखला दिला. तथापि, सरकारमान्य लॅबमध्ये चाचणी केला असता त्यांच्या शरीरात करोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीच तयार झाली नसल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच त्यांच्या प्लेटलेट्स तीन लाखांहून दीड लाखांवर आल्या होत्या. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून केव्हाही मृत्यू होण्याच शक्यता असल्याने हा हत्येचाच प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

  FIR न झाल्यास कोर्टात जाणार

  या प्रकरणी पोलिसांनी प्रतापचंद्र यांची तक्रार दाखल करून घेतली आहे परंतु एफआयआर दाखल केलेला नाही. दरम्यान प्रतापचंद्र यांनी एफआयआर दाखल केला नाही तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे.

  हे सुद्धा वाचा