महाराष्ट्र-कर्नाटक सीमा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा

महाराष्ट्र, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी स्थानिक जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दिलेल्या निर्देशानुसार कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्‍तव्य केले होते.

  कोगनोळी (Cognoli). महाराष्ट्र, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी स्थानिक जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दिलेल्या निर्देशानुसार कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्‍तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलिस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना सोमवारपासून परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.

  महाराष्ट्रातून येणाऱ्या मार्गावर कोगनोळी, अथणी, निपाणी, बोरगाव, कागवाड येथे चेकपोस्ट उभारण्यात आले असून वाहनांची कसून चौकशी व तपासणी करण्यात येत आहे. सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.शेजारील महाराष्ट्र राज्यांमध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोगनोळीसह अन्य मार्गावरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस उपाधीक्षक, मडल पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचा ताफा चेकपोस्टवर तैनात करण्यात आला आहे. हे कर्मचारी याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत.

  कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत महाराष्ट्रात पाठवून देत आहेत.कोगनोळी चिक्‍्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नायक, मंडल पोलिस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह पन्नासहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

  पोलिसांनी सर्व खाजगी बसना नवीन मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती दिली आहे. आरटीपीसीआर शिवाय प्रवाशांना त्यांच्या वाहनांमध्ये नेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. वस्तू व सेवा देणारी वाहने बंद राहणार नाहीत. महाराष्ट्र व केरळ वगळता इतर राज्यातून येणारे, जर ते फक्त मार्गाने महाराष्ट्र जात असतील तर त्यांना थांबवले जाणार नाही. मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी खासगी वाहनेच चेकपोस्टवर तपासली जात आहेत.

  महाराष्ट्रातील येणाऱ्या विविध मार्गावर चेकपोस्ट
  अथणी-जत, बोरगाव-इचलकरंजी,निपाणी-मुरगूडबेळगाव जिल्हा पोलिसांकडून कोगनोळी-निपाणी,कागवाड-मिरज,येथे चेकपोस्ट सुरू केले आहेत. तेथे महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची व वाहनांची तपासणी सुरू आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत आहे. शिवाय आरटीपीसीआर रिपोर्ट पाहीजे नसल्यास प्रवेश नाही.