No one goes out of town; A village that was 'locked' for four months

पावसाळा सुरू होताच जिल्ह्याच्या अनेक भागात नदी – नाल्यांना पूर येतो. यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या समस्या काही दिवस किंवा आठवड्यांच्या असतात. परंतु, मधुबनी येथील मधवापुर प्रखंडातील एक गाव असे आहे, जेथे पूर्ण पावसाळा म्हणजे जवळपास 4 महिने येथील ग्रामस्थांचे गावाबाहेर निघू शकत नाहीत. ते गावातच लॉक होतात.

  मधुबनी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्याच्या अनेक भागात नदी – नाल्यांना पूर येतो. यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या समस्या काही दिवस किंवा आठवड्यांच्या असतात. परंतु, मधुबनी येथील मधवापुर प्रखंडातील एक गाव असे आहे, जेथे पूर्ण पावसाळा म्हणजे जवळपास 4 महिने येथील ग्रामस्थांचे गावाबाहेर निघू शकत नाहीत. ते गावातच लॉक होतात.

  या गावाचे नाव अकरहाराघाट आहे. या गावाच्या उत्तर डावीकडे नेपाळ आहे. पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडून हे गाव नेपाळकडून येणाऱ्या नद्या व काही पावसाळी नद्यांनी वेढले आहे. दक्षिणेकडे गावापर्यंत पोहोचण्यासाठी एकमात्र रस्ता आहे.

  ग्रामस्थ स्वत: पुलाची डागडुजी करतात

  आश्चर्याची बाब म्हणजे या रस्त्यावरील नदीवर बांधलेला पूल देखील ब्रिटीशांच्या काळातील आहे. जो लाकडाचा बनलेला असून आता पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. उर्वरित हंगामात नद्यांमध्ये पाणी नसल्यामुळे पुलाखालून ग्रामस्थ आवागमन करतात, परंतु पावसाळ्यात हा मोडकळीस पूलच ग्रामस्थांचा एकमेव आधार असल्याने त्यांनी जीव मुठीत घेऊन येथून आवागमन करावे लागते. पावसाळ्यात ग्रामस्थ स्वत: या पुलाची डागडुजी करतात. परंतु, दमदार पावसात या पुलावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे.

  ऑक्टोबरनंतर होते ‘अनलॉक’

  स्थानिक लोकांनी सांगितले की, पावसाळ्यात आवश्यक सामानासाठी गावाच्या बाहेर निघणेही कठीण होते. तर कुणाची प्रकृती बिघडली तर देवच त्याला वाचवू शकतो. अशाप्रकोर 4 महिने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यानंतर ऑक्टोबरमध्ये गाव ‘अनलॉक’ होते. दरवेळी निवडणुकीदरम्यान येथील ग्रामस्थांना पक्के पुल बनविण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु, स्वातंत्र्याचे 74 वर्षे लोटल्यानंतरही अकरहाराघाट गावचे चित्र तसेच आहे.