नॉनव्हेज पिझ्झामुळे धर्मभ्रष्ट झाला; महिलेने अमेरिकन कंपनीकडे मागितली एक कोटींची भरपाई

या महिलेने व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता, मात्र त्याजागी चुकून नॉन व्हेज पिझ्झा पाठवला गेला. हे पाहून महिलेचा राग इतका अनावर झाला की, तिने थेट ग्राहक मंचाचे दरवाजे ठोठावले. नॉनव्हेज पिझ्झामुळे धर्मभ्रष्ट झाला असून कंपनीने आपल्याला 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी सदर महिलेने केली आहे.

    गाजियाबाद :  इंटरनेट आणि ऑनलाईन शॉपिंगच्या युगात कधी काय घोळ होईल, याची काहीही शास्वती नाही. असाच एक घोळ अमेरिकन पिझ्झा कंपनीला चांगलाच महागात पडला आहे. नॉनव्हेज पिझ्झामुळे धर्मभ्रष्ट झाल्याची तक्रार करीत महिलेने कंपनीकडे थेट एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

    या महिलेने व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता, मात्र त्याजागी चुकून नॉन व्हेज पिझ्झा पाठवला गेला. हे पाहून महिलेचा राग इतका अनावर झाला की, तिने थेट ग्राहक मंचाचे दरवाजे ठोठावले. नॉनव्हेज पिझ्झामुळे धर्मभ्रष्ट झाला असून कंपनीने आपल्याला 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी सदर महिलेने केली आहे.

    उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील दिपाली त्यागी यांनी 21 मार्च 2019 रोजी एका अमेरिकी पिझ्झा रेस्टॉरंटमधून व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता. मात्र, कंपनीने त्यांच्या घरी जो पिझ्झा पाठवला तो नॉनव्हेज होता. दिपालीने याप्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. मी कौटुंबिक आणि धार्मिक गोष्टींचे पालन करणारी शाकाहारी महिला आहे. या नॉनव्हेज पिझ्झामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे.