कोरोनाबाधित नाही; 32 जणांना काळ्या बुरशीचा विळखा

कोरोना विषाणूचा सामना केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर अनेक रुग्णांना काळी बुरशी म्हणजेच ब्लॅक फंगसने जखडले आहे. कोरोनाबाधितांसाठी हा नवा आजार डोकेदुखीही ठरला आहे. आता मात्र काळ्या बुरशीने कोरोनाबाधित नसणाऱ्यांनाही विळखा घातल्याचे पंजाबमध्ये दिसून आले आहे.

    दिल्ली : कोरोना विषाणूचा सामना केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर अनेक रुग्णांना काळी बुरशी म्हणजेच ब्लॅक फंगसने जखडले आहे. कोरोनाबाधितांसाठी हा नवा आजार डोकेदुखीही ठरला आहे. आता मात्र काळ्या बुरशीने कोरोनाबाधित नसणाऱ्यांनाही विळखा घातल्याचे पंजाबमध्ये दिसून आले आहे.

    राज्यात ब्लॅक फंगसचे 158 पेक्षा अधिक रुग्ण आढळले होते त्यापैकी 32 रुग्णांना कोरोना झाला नव्हता, असेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता चिंता व्यक्त केली जात आहे.

    ज्या लोकांना कोरोना झाला होता त्यांना उपचारादरम्यान स्टेरॉईड दिल्यामुळेच ब्लॅक फंगसची बाधा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. परंतु या 32 रुग्णांना अन्य आजारावरील उपचारदारम्यान स्टेरॉईड देण्यात आले असावे असा वैद्यकीय क्षेत्रात मतप्रवाह आहे.