man with mask

सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमस्थळी आणि वाहतुकीदरम्यान मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. या नियमांचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर डिजास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्ट २००५ आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाईचे आदेश दिले आहे. सरकारने याबाबतची सूचना कलेक्टर, जिल्हा मॅजिस्ट्रेट, आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत. सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेलंगाना सरकार लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे.

    हैदराबाद: देशात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इतकंच नव्हे तर काही राज्यांमध्ये तर लॉकडाऊनसारखी स्थितीनिर्माण झाली आहे. मात्र तरी अनेक लोक कोरोनाच्या नियमाचे पालन करत नाहीत. त्यामुळे आता तेलंगाना सरकारने नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. मात्र तरीही लोक सरकारचा आदेश पायदळी तुडवताना दिसत आहे. त्यामुळे तेलंगाना सरकारने आता नियम मोडणारे नागरिक, तेलंगानात बिना मास्क फिरताना कोण आढळले तर त्याला तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे.

    राज्यात सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमस्थळी आणि वाहतुकीदरम्यान मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. या नियमांचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर डिजास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्ट २००५ आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाईचे आदेश दिले आहे. सरकारने याबाबतची सूचना कलेक्टर, जिल्हा मॅजिस्ट्रेट, आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत. सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेलंगाना सरकार लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे.

    ‘राज्यात लॉकडाऊन लावणार नाही. उद्योगधंदे सुरुच राहतील. त्यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाही. मात्र काळजी घ्या’ असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी स्पष्ट केले आहे. तेलंगानात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण मोहीम आणखी वेगाने केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चाचण्याही केल्या जात आहेत.

    तेलंगानामध्ये आतापर्यंत ३० लाख ६ हजार ३३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३० लाख १५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे १ हजार ६८८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ हजार ४९५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.