Now more dangerous yellow fungus after black and white; The first patient found in Uttar Pradesh

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच ब्लॅक फंगसच्या रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. आता उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचा पहिलचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. यलो फंगसचा संसर्ग ब्लॅक आणि व्हाईट संसर्गाच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उत्तरप्रदेशात आढळलेल्या पहिल्या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  दिल्ली :  कोरोनाचे थैमान सुरू असतानाच ब्लॅक फंगसच्या रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. आता उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचा पहिलचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. यलो फंगसचा संसर्ग ब्लॅक आणि व्हाईट संसर्गाच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उत्तरप्रदेशात आढळलेल्या पहिल्या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  लक्षणे

  सुस्ती येणे, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे. गंभीर प्रकरणांमध्ये जखमांमधून पू बाहेर येणे आणि जखमा भरण्यासाठी गरजेपेक्षा अधिक वेळ लागण्याच्या समस्या उद्भवतात.
  अवयव निकामी होणे, डोळ्यांचा आकार कमी होणे, डोळे कोरडे पडणे.

  इंजेक्शन हाच उपचार

  यलो फंगसची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे याचा संसर्ग झाल्याचे तत्काळ कळत नाही. शरीराअंतर्गत याचा संसर्ग झाल्यानंतर हळूहळू लक्षणे दिसू लागतात. त्यामुळेच काहीही लक्षणे दिसली तरी तातडीने औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन हा सध्या यावरील एकमेव उपचार आहे.

  देशात ब्लॅक फंगसची 5424 प्रकरणे

  देशातील 18 राज्य आणि केंद्रशासित राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे 5424 प्रकरणे समोर आली असून त्यापैकी 55 टक्के म्हणजेच 4556 रुग्णांना मधुमेह होता, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. सर्वाधिक रुग्णसंख्या गुजरातमध्ये 2165 , महाराष्ट्र 1188, उत्तरप्रदेश 663, मध्यप्रदेश 519, हरयामा 339 आणि आंध्रप्रदेशात 248 असल्याची माहिती त्यांनी दिली.