Now the threat of 'green fungus' The first patient found in Indore, admitted to Mumbai for treatment

ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. कोरोनाच्या थैमानानंतर पांढऱ्या बुरशीचेही रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ आता हिरव्या बुरशीचाही शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमधील कोरोनावर मात केलेल्या एका रुग्णाला हा संसर्ग झाला आहे.

    इंदूर : ब्लॅक फंगस म्हणजेच काळी बुरशी हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. कोरोनाच्या थैमानानंतर पांढऱ्या बुरशीचेही रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ आता हिरव्या बुरशीचाही शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमधील कोरोनावर मात केलेल्या एका रुग्णाला हा संसर्ग झाला आहे.

    या रुग्णाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले असून त्याच्यावर मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची देशातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.

    फुफ्फुस व रक्तात संसर्ग

    या रुग्णाला काळ्या बुरशीने जखडले असल्याचे निदान होताच त्याची चाचणी केली असता त्यास काळ्या नव्हे तर हिरव्या बुरशीची लागण झाल्याचे निदान झाले. हा रुग्ण कोरोनामधून बरा झाला होता मात्र त्याची चाचणी केली असता त्याच्या फुफ्फुसात आणि रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याची माहिती अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉ. रवी दोशी यांनी दिली. या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    हे सुद्धा वाचा