nurse video viral

आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. सध्या एका नर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर(nurse video on social media) प्रचंड व्हायरल होत आहे. 

    कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे.आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. औषधे उपलब्ध नसल्यामुळे कित्येक नागरिकांचा तडफडून मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत मात्र आपले आरोग्य कर्मचारी जिवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. सध्या एका नर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर(nurse video on social media) प्रचंड व्हायरल होत आहे.


    हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या राज्य माहिती आयुक्तांनी आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक नर्स कोविड वॉर्डमध्ये असलेल्या  रुग्ण महिलेला जेवण भरवताना दिसत आहे. महिलेची प्रकृती नाजूक असल्यामुळे तिला कृत्रिम ऑक्सिजन प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त महिलेला जेवता येत नसल्यामुळे ही नर्स जेवण भरवतेय.

    हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला आहे. नर्सचे रुग्णाप्रति असलेले समर्पण पाहून अनेकांनी देशात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला आहे. अनेकांनी या महिला नर्सचे अभिनंदन केले असून ती जेवण भरवत असलेली महिला लवकरात लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना केली आहे.