sanitizer use

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये(Viral Video) आजोबांनी सॅनिटायजरला(Sanitizer) तेल समजून अंगभर मसाज करत असल्याचे दिसते. व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजोबा आपलं डोकं, हात, पाय आणि चेहऱ्यावर सॅनिटायजरने मसाज करीत आहेत.

    कोरोनाच्या काळात अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत आहेत. हे व्हिडिओ पाहून कधी रडू कोसळते तर कधी हसू येते.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान ‌व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हाला हसू फुटेल.

    कोरोनापासून बचाव करण्यासाठी सगळेच सॅनिटायजरचा वापर करताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आजोबांनी सॅनिटायजरला तेल समजून अंगभर मसाज करत असल्याचे दिसते. व्हि़डीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजोबा आपलं डोकं, हात, पाय आणि चेहऱ्यावर सॅनिटायजरने मसाज करीत आहेत.


    हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, ‘इसका कोरोना बाल भी बाका नही कर सकता…पर #मास्क नीचे नहीं करना था चाचा’.