
पत्नीची प्रस्तुती सुरु असताना तिला पतीच्या मृत्यूची बातमी कळाली. रवि यादव आपल्या बाळाला पाहण्यापूर्वीच निरोप घेतला आहे. पतीची अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना पत्नीला प्रस्तुतीसाठी असहाह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बिहार : बिहार नेहमी हत्या आणि गुन्हेगारी विषयाच्या बाबतीत चर्चिले जाते. राजकीय नेत्यांची सर्रास हत्या केली जाते. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली असल्याचे समजते आहे. राजदच्या एका युवा नेत्याची गोळ्या घालून ह्त्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीला प्रस्तुतीदरम्यान तिच्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. महिलेने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. परंतु आनंदाचे वातावरण आले असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बिहारमधील भोजपु शेहरी येथे राहणारे युवा नेते रवि यादव याला काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार केले. रवि हे हरिद्वार सिंग यांचे पुत्र होते. रविचा मृतदेह गुरुवारी सकाळी रामडीहरा रोडच्या काठावरील करहा येथे सापडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. आपला एकुलता एक पुत्र गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
पत्नीची प्रस्तुती सुरु असताना तिला पतीच्या मृत्यूची बातमी कळाली. रवि यादव आपल्या बाळाला पाहण्यापूर्वीच निरोप घेतला आहे. पतीची अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना पत्नीला प्रस्तुतीसाठी असहाह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृत रवी यादव बुधवारी संध्याकाळी मंदुरी येथील आपल्या घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. पण रात्री उशिरापर्यंत तो घरी पोहचला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली असता गुरुवारी सकाळी दुचाकीसह रविचा मृतदेह गावाजवळ पडला.
घटनास्थळावरुन तीन खोके देखील जप्त केले असून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी अज्ञात लोकांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी, स्थानिक लोकांनी आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी मारेकऱ्यांच्या अटकेसाठी मृतदेहासह आरा-सासाराम राज्य महामार्ग रोखला होता.