One crore of those waiting for the rain of money disappear

2016 साली हितेशने पैशांच्या पावसासाठी जिग्नेशकडे अनेक वस्तू मागितल्या. त्यात तीन स्कूटर, चार लाख रुपयांचे दागिने तसेच 50 हजार एकर जमीन मागितली. त्यानुसार जिग्नेशने स्कूटर आणि दागिने दिले होते. जमीनीसाठी जिग्नेशने आपल्या आई वडिलांचे बँकेतील सर्व रक्कम आणि फिक्स डीपॉझिट तोडून एकूण 96 लाख रुपये असे टप्प्या टप्प्याने हितेशकडे दिले. परंतु त्यानंतरही हितेशने पैशांचा पाऊस पाडला नाही.

    अहमदाबाद : तेलही गेले तुपही गेले, हाती धुपाटणे आले अशी एक मराठीत म्हण आहे. या म्हणीची प्रचिती गुजरातमधील एका व्यक्तीला आली आहे. पैशांचा पाऊस पाडेन असे आमिष दाखवत भोंदू बाबाने या व्यक्तीला कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या व्यक्तीने अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

    अहमदाबादचा रहिवासी जिग्नेश मोहोरीवाल हा अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. तसेच एखादा व्यवसाय करावा असे जिग्नेशच्या मनात होते. जिग्नेशचे वडील सरकारी खात्यातील निवृत्त कर्मचारी होते. 2010 साली जिग्नेशची ओळख हितेश याग्निकशी झाली. हितेश नेहमी मंत्र तंत्राबाबत जिग्नेशला सांगत असे. आपल्याकडे अलौकिक शक्ती असून त्यामुळे पाऊस पाडण्याची आपल्याकडे दिव्य शक्ती आहे असा दावा हितेशने जिग्नेशकडे केला होता. हितेशने जिग्नेशच्या घरात एक झाड ठेवले होते आणि त्याच्या घरी आल्यावर तो वेगवेगळ्या प्रकारच्या पूजाही करत असे.

    2016 साली हितेशने पैशांच्या पावसासाठी जिग्नेशकडे अनेक वस्तू मागितल्या. त्यात तीन स्कूटर, चार लाख रुपयांचे दागिने तसेच 50 हजार एकर जमीन मागितली. त्यानुसार जिग्नेशने स्कूटर आणि दागिने दिले होते. जमीनीसाठी जिग्नेशने आपल्या आई वडिलांचे बँकेतील सर्व रक्कम आणि फिक्स डीपॉझिट तोडून एकूण 96 लाख रुपये असे टप्प्या टप्प्याने हितेशकडे दिले. परंतु त्यानंतरही हितेशने पैशांचा पाऊस पाडला नाही.

    पैसे तर गेलेच जमीनही जिग्नेशच्या नावावर झाली नव्हती. मार्च महिन्यांपासून हितेश गायबच झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याची जाणीव जिग्नेशला झाली. त्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपी हितेश सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.