धक्कादायक! १० लाख रूपयांच्या बहाण्याने त्याने अशी केली तिची फसवणूक, जाणून घ्या सविस्तर..

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरूणीला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. एक तरूण १० लाख रूपये मागून ब्लकमेल करत असल्याची तक्रार एका तरूणीने पोलिसांत दाखल केली आहे.

    रांची : १० लाख रूपयांच्या बहाण्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरूणीला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. एक तरूण १० लाख रूपये मागून ब्लकमेल करत असल्याची तक्रार एका तरूणीने पोलिसांत दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणाचं  नाव शफीक अन्सारी असं आहे. फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील, तर १० लाख रुपये खंडणी देण्याची मागणीही त्याने केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.

    सोशल मीडियावर कशी झाली मैत्री ?

    सोेशल मीडियावर दोघांचीही ओळख झाल्यानंतर हळूहळू ही ओळख मैत्रीत परिवर्तीत झाली आणि त्यानंतर दोघांच्याही गाठीभेटी होऊ लागल्या. परंतु एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष भेटल्यानंतर दोघेही आपापला फोन ऐकमेकांना देत असत आणि फोन बदलत असल्यामुळे या संधीचा फायदा घेऊन तरूणाने तिचे काही व्हिडिओ आणि फोटोज स्वत:कडे घेतले. फोटो मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्याने तरूणीला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. जे फोटो या तरूणाने घेतले त्याचा वापर त्याने फोटोशॉप करून मुळ फोटो बदलले. त्यानंतर अश्लिल फोेटो आणि व्हिडिओ या तरूणाने तयार केल्याचा आरोप तरूणीने पोलिसांकडे केला आहे.

    तरूणीला गोष्ट समजताच बसला धक्का..

    या गोष्टीचा उलघडा झाल्यानंतर तिला जबरदस्त धक्काच बसला. शफीकने तरुणीची ओळख असणाऱ्या काही ग्रुपमध्ये फोटो टाकायला सुरुवात केली. त्यानंतर तिने याचा जाब विचारल्यानंतर त्याचा स्वभावचं बदलला. त्याने तिला थेट जीवे मारण्याची आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या फोटोंच्या बहाण्याने त्याने १० लाख रुपये देण्याची मागणी तरुणीकडे केली. त्यानंतर तरुणीने हा सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरूणाविरोधात तक्रार दाखल केली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.