milk theft

बेगूसराय जिल्ह्यातील एक व्हिडिओ(begusarai milk theft video) फुटेज व्हायरल होत आहे. यात एक चोर १३ लिटर दूध चोरताना दिसत आहे. दूध कॅरेट्स चोरल्याबद्दल या क्षेत्रात विविध प्रकारची चर्चा आहे.

    बेगूसराय : बिहारमधील विविध जिल्ह्यात गुन्हेगारीच्याcrime in bihar) घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये चोरी, दरोडे, लूटमार अशा घटनांसह प्राणघातक हल्ला, खून, दुष्कर्म इत्यादी घटनाही उघडकीस आल्या आहेत. याच अनुषंगाने बेगूसराय जिल्ह्यातील एक व्हिडिओ(begusarai milk theft video) फुटेज व्हायरल होत आहे. यात एक चोर १३ लिटर दूध चोरताना दिसत आहे. दूध कॅरेट्स चोरल्याबद्दल या क्षेत्रात विविध प्रकारची चर्चा आहे.

    हा व्हायरल व्हीडिओ शहरातील आंबेडकर नगर पोलिस स्टेशनचा असल्याचे सांगितले जात आहे. ज्या किराणा दुकानातून दुधाची चोरी झाली आहे त्याच्या मालकाने चोर पकडणाऱ्याला १००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दूध चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात चोरचा चेहरादेखील दिसू शकतो. या व्हिडिओमध्ये पहिल्या चोराने दुधाची काही पाकिटे चोरली आणि ती आपल्या झोळीमध्ये ठेवली. यानंतर त्याने संपूर्ण कॅरेट चोरले. मात्र त्याची चोरी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केली जात आहे हेदेखील त्याला माहिती नव्हते. दुधाची कॅरेट चोरल्यानंतर ते कॅरेट दुचाकीवर ठेवून तो पळून गेला. दुकानात चोरी करणाऱ्यास दुकानाच्या मालकाने दूध चोरास पकडणाऱ्याला १००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आंबेडकर नगरातील लोकही आश्चर्यचकित झाले आहेत की चोराने दूध चोरी का केले असावे ?