naxalite

छत्तीसगडमध्ये (chattisgad) पोलिसांना एका मोठ्या मोहिमेत यश आले आहे. दंतेवाडा(dantewada) भागातील ५ लाखांचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा पोलिसांनी खात्मा(naxalite killed) केेला आहे.

छत्तीसगडमध्ये (chattisgad) पोलिसांना एका मोठ्या मोहिमेत यश आले आहे. दंतेवाडा(dantewada) भागातील ५ लाखांचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा पोलिसांनी खात्मा(naxalite killed) केेला आहे. दंतेवाडा परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये छिकपल आणि मरजूमधील जंगलात चकमक झाली. त्यानंतर हा नक्षलवादी ठार झाला.

दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्याकडून ९ एमएमचे एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले.  पोलीस व नक्षलवाद्यांमधील चकमकीत हा नक्षलवादी ठार झाला. या अगोदर छत्तीसगडमधील याआधीच्या चकमकीत २ महिला नक्षलींचा खात्मा करण्यात आला होता. त्यांच्याकडूनही शस्त्रे हस्तगत करण्यात आली होती.

दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये २७ नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये शरणागती पत्करली होती. दरम्यान काही जणांना पकडण्यासाठी रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलीस पथकांवर हल्ले करणे, भूसुरुंगाचा स्फोट घडविणे यामध्ये या नक्षलवाद्यांचा हात होता. पैकी पाच जणांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.