on the threshold of mim footpath in solapur

गोध्रा नगरपरिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी ट्विट केले आहे. गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणे हा ऐतिहासिक विजय असल्याचे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी म्हटले आहे. भाजपकडून सत्ता खेचून आणल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वारिस पठाण यांनी अभिनंदन केले आहे. एमआयएमने गुजरातमध्ये गोध्रात सत्ता स्थापन करून यशस्वी सुरुवात केल्याचे पठाण म्हणाले आहेत.

    गोध्रा :  २००२ साली गुजरातमधील गोध्रा हत्याकांडमुळे हे चर्चेत आले होते. त्यानंतर आता १९ वर्षांनंतर एमआयएमने गोध्रा नगरपरिषदेवर अपक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. गोध्रा नगरपरिषदेतील भाजपची सत्ता एमआयएमने अपक्षांना बरोबर घेत हस्तगत केली आहे.

    गोध्रा नगरपरिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी ट्विट केले आहे. गोध्रामध्ये सत्ता स्थापन करणे हा ऐतिहासिक विजय असल्याचे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी म्हटले आहे. भाजपकडून सत्ता खेचून आणल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वारिस पठाण यांनी अभिनंदन केले आहे. एमआयएमने गुजरातमध्ये गोध्रात सत्ता स्थापन करून यशस्वी सुरुवात केल्याचे पठाण म्हणाले आहेत.

    नुकत्याच गुजरातमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. एमआयएमने त्यामध्ये चांगले यश मिळवले होते. गोध्रा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला  १८, काँग्रेसला १, एमआयएमला ७ आणि अपक्षांना १८ जागांवर विजय मिळाला होता. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गोध्रामध्ये प्रचारदेखील केला होता.