Owaisi joins hands with Kamal Hassan in Tamil Nadu!

कमल हसन यांच्या पक्षाची असदुद्दीन ओवेसींच्या पक्षासोबत हातमिळवणी होणार असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. ओवेसींचा एआयएमआयएम आणि कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम यांच्यात युती होण्याची शक्यता असून एआयएमआयएम आणि एमएनएम २५ जागा लढविणार असल्याची चर्चा आहे.

चेन्नई : तामिळनाडूत पुढील वर्षी एप्रिल- मे महिन्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. निवडणुका जवळ येताच राज्यातील वातावरणही तप्त होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता कमल हसन यांचा राजकीय पक्षही रिंगणात उतरणार असल्याने रंगत वाढणार असल्याचे दिसत आहे.

कमल हसन यांनी अन्य राजकीय पक्षांवर हल्लेही करणे सुरू केले आहे. आता तर कमल हसन यांच्या पक्षाची असदुद्दीन ओवेसींच्या पक्षासोबत हातमिळवणी होणार असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. ओवेसींचा एआयएमआयएम आणि कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम यांच्यात युती होण्याची शक्यता असून एआयएमआयएम आणि एमएनएम २५ जागा लढविणार असल्याची चर्चा आहे.

एआयएमआयएमच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एक बैठकीत त्रिची आणि चेन्नईत एआयएमआयएम पक्षाचे संमेलन घेण्यावर विचार करीत आहे. तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष वेकेल अहमद यांनी राज्याच्या निवडणुकीत एआयएमआयएम २५ ते ३० जागा लढवू शकते असे मत व्यक्त केले. उत्तर तामिळनाडूत एक मुस्लिमबहुल भाग असून मदुराई, कृष्णागिरी, वेल्रोर आणि तिरुपथूर येथे पक्षाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. उल्लेखनीय असे की एआयएमआयएमने वानियाबादी येथून निवडणूक लढविली होती.

दरम्यान, कमल हसन यांनी सोमवारी २०२१ च्या विधानसभा निवडणुका लढविणार असल्याची घोषणा केली. तथापि कोणत्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील याची घोषणा नंतर करणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.