हरियाणात गाडी व चार मजली घराचे मालकही गरीब; मुख्यमंत्र्यांचे गरिबीचे नवे मापदंड

मनोहरलाल खट्टर यांनी हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे सांगितले. यात कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्यात आले आहे. मायक्रो इरिगेशनवर जोर वाढविला आहे.२००६ नंतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर याचा परिणाम पडू शकतो. कोणीही आजारी पडू नये, अशी व्यवस्था बनविण्यात येणार आहे. यासाठी ११०० वेलनेस सेंटर बनविण्याची योजना आहे. तसेच वीजचोरी व वीजहानी होणार नाही याचीही दक्षता घेण्यात येणार आहे.

    चंदीगड: ‘किसी को अपने अमल का हिसाब क्या देते, सवाल सारे गलत थे जवाब क्या देत’ या शायरीतून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी बजेट प्रस्तावावरील चर्चेनंतर विरोधी पक्षाला उत्तर दिले. किस्से-कहाणी, विनोद व शायरी यामुळे सभागृहाचे वातावरण आनंदी झाले. कधी मनोहरलालांनी किस्से ऐकविले, तर कधी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांनी हरियाणवी अंदाजात म्हणी ठेवल्या. यादरम्यान राज्यात गरिबीविषयीचे नवीन मापदंड सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, आता १ लाख ८० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गरीब श्रेणीत ठेवण्यात येणार आहे. अशा व्यक्तीकडे कार व चार मजली घरे असली, तरी त्याची श्रेणी तीच राहणार आहे. जातिवादी व्यवस्थेपेक्षा आर्थिक रूपान कमजोर वर्गाविषयी विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोहरलाल खट्टर यांनी हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे सांगितले. यात कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्यात आले आहे. मायक्रो इरिगेशनवर जोर वाढविला आहे.२००६ नंतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर याचा परिणाम पडू शकतो. कोणीही आजारी पडू नये, अशी व्यवस्था बनविण्यात येणार आहे. यासाठी ११०० वेलनेस सेंटर बनविण्याची योजना आहे. तसेच वीजचोरी व वीजहानी होणार नाही याचीही दक्षता घेण्यात येणार आहे.

    हुड्डा म्हणाले, सगळी कामे तुम्हीच केलीत
    हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या भाषणादरम्यान अनेकवेळा हस्तक्षेप केला. मनोहरलाल असा दावा करीत आहेत की जसे सगळी कामे त्यांनीच केली आहे. यापूर्वीच्या सरकारांनी काहीच कामे केली नाहीत, असे हुड्डा म्हणाले. मनोहरलाल असेही म्हणू शकतात की, हरियाणा त्यांनी बनविले, अशी कोपरखळीदेखील हुड्डांनी दिली. हरियाणाचे कर्ज, उत्पन्न व कामांची तुलना दुसऱ्या राज्यांशी करणे चुकीचे आहे. सरकारला आपला योग्य हिशोब देणे आवश्यक आहे. सरकारे जी आश्वासने पूर्ण होऊ शकतात, अशीच आश्वासने जनतेला द्यावीत, असेही हुड्डा यांनी सांगितले. हुड्डा यांना मनोहरलाल यांनी चित आणि पट दोन्ही तुमचीच असू शकणार नाही, असे उत्तर दिले.

    १०५७ प्राथमिक व माध्यमिक शाळा होणार बंद
    हरियाणा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सत्रात राज्यात १०५७ प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होणार असल्याची घोषणा केली. ज्या शाळांमध्ये २५ विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी आहेत, त्या शाळा नवीन सात बंद होतील. राज्यात अशा ७४३ प्राथमिक शाळा आहेत जिथे विद्यार्थी संख्या 25 पेक्षा कमी आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेपासून १ किलोमीटर असणाऱ्या शाळांमध्ये पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या शाळांमध्ये असणाऱ्या १,३०४जेबीटी शिक्षकांनाही दुसऱ्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे.