oxygen plant blast in uttar pradesh

लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने(Oxygen cylinder blast in lucknow) २ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला आहे. लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने(Oxygen cylinder blast in lucknow) २ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक ऑक्सिजन प्लांटचा कर्मचारी आणि दुसरा गॅस भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    संबंधित घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑक्सिजन सिलेंडर फुटल्यामुळे अनेक कामगार भाजले आहेत. केटी ऑक्सिजन प्लांट हा चिन्हाट पोलीस ठाणे हद्दीतील देवा रोडवर आहे

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेप्रती दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करण्याते आदेश दिले. त्यांनी या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.