पाहा व्हिडिओ – महिलांनी चालविली ऑक्सिजन एक्सप्रेस; रेल्वेमंत्र्यांनी केले कौतुक

देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. देशात असलेल्या ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहे. संपूर्णपणे महिलांकडून संचालित ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे जमशेदपूरहून 120 मॅट्रिक टन ऑक्सिजन घेऊन बंगळुरूला पोहोचली.

    बंगळुरू :  देशात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. देशात असलेल्या ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहे. संपूर्णपणे महिलांकडून संचालित ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वे जमशेदपूरहून 120 मॅट्रिक टन ऑक्सिजन घेऊन बंगळुरूला पोहोचली.

    याचे सगळीकडून कौतुक होत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले की, कर्नाटकसाठी सातवी ऑक्सिजन एक्सप्रेस टाटानगरहून(जमशेदपूर) बंगळुरूला पोहोचली. फक्त महिला चालकद्वारे संचलित ही ऑक्सिजन एक्सप्रेस रेल्वेमुळे राज्यात कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.