Pakistani locust crisis again; The locusts entered Jaisalmer in Rajasthan

    जयपूर : वर्षभरापूर्वी टोळधाडींनी उत्तर भारतातील काही भागात धुमाकूळ घातला होता. आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा ही टोळधाड राजस्थानातील जैसलमेर येथे दाखल झाली असून संभाव्य संकट पाहू जाता शेजारील उत्तरप्रदेशातील कृषी विभागाने याबाबत अलर्ट जारी केला आहे व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याच आठवड्याच्या अखेरीस ही टोळधाड राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. कीटकांची ही टोळी अख्खे पीक नष्ट करू शकते.

    राजस्थानातील जैसलमेर येथे ही टोळधाड दिसून आली असून मेअखेरीस उत्तरप्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत शेतात पीक नाही तथापि जिल्ह्यात 30000 हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीसह शेतकऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

    कीटकांचा हा झुंड दिवसाला 150 कि.मी. प्रवास करतो. दरम्यान, थाळी, टीन, ढोल बडवूनही या कीटकांना पिटाळता येते अशी माहितीही कृषी विभागाने दिली.